T20 World Cup 2024 : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) पाकिस्तानने (Pakistan) आपला संघ जाहीर केला आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बाबर आझमकडे (Babar Azam) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) आणि अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमला देखील स्थान देण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यामुळे तो या स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे केवळ पाकिस्तानच्या चाहत्यांचा नाहीतर संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असणार आहे. याच बरोबर संघात वेगवान गोलंदाज हरिस रौफचे देखील पुनरागमन झाले आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना रौफला दुखापत झाली होती मात्र आता तो पूर्ण फिट असल्याची घोषणा पीसीबीकडून करण्यात आली आहे. रौफच्या आगमनाने पाकिस्तान संघाची गोलंदाजी आक्रमण मजबूत होणार आहे.
या स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 6 जून रोजी यजमान यूएसए विरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात 9 जून रोजी पाकिस्तान भारतीय संघाशी भिडणार आहे. 11 जून रोजी पाकिस्तान आपला तिसरा सामना कॅनडा विरुद्ध खेळणार आहे. तर 16 जून रोजी आयर्लंड विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार आहे.
T20 World Cup 2024 साठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान
पाकिस्तानच्या सामन्यांचे वेळापत्रक
पाकिस्तान विरुद्ध यूएसए – 6 जून
पाकिस्तान विरुद्ध भारत – 9 जून
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा – 11 जून
जबरदस्त मायलेज अन् भन्नाट फीचर्स, 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘ह्या’ कार्स
पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड – 16 जून