The Hundred League Draft : इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘द हंड्रेड लीग’ (The Hundred League Draft) क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेसाठी आयोजित ड्राफ्टमध्ये तब्बल 50 पाकिस्तानी खेळाडूंनी नाव दिला होता मात्र त्यापैकी एकालाही खरेदीदार मिळाला नाही. पाकिस्तानच्या 45 पुरुष आणि पाच महिला क्रिकेटपटूंची नावे ड्राफ्टमध्ये होती. या ड्राफ्टमध्ये नसीम शाह (Naseem Shah), सैम अयुब (Saim Ayub) आणि शादाब खान (Shadab Khan) सारख्या सुपरस्टार खेळाडूंची नावे होती मात्र एकालाही खरेदीदार मिळाला नाही.
तर महिला क्रिकेटपटूंमध्ये आलिया रियाझ, फातिमा सना, युसरा आमिर, इरम जावेद आणि जावेरिया रौफ सारख्या खेळाडूंची नावे होती ज्यांना खरेदीदार मिळाले नाहीत. या ड्राफ्टमध्ये नसीन खान, शादाब खान टॉप ब्रॅकेटमध्ये होते ज्यांची किंमत £120,000 होती तर अयुब £78,500 च्या ब्रॅकेटमध्ये होता. याचे एक कारण इंडियन प्रीमियर लीगच्या मालकांनी द हंड्रेड संघांमध्ये गुंतवणूक केली आहे.
चार आयपीएल संघ – मुंबई इंडियन्स (ओव्हल इन्व्हिन्सिबल्स), लखनौ सुपर जायंट्स (मँचेस्टर ओरिजिनल्स), सनरायझर्स हैदराबाद (नॉर्दर्न सुपरचार्जर्स) आणि दिल्ली कॅपिटल्स (सदर्न ब्रेव्ह) – यांचे द हंड्रेड संघांमध्ये गुंतवणूक केली आहे.
महायुतीत नाराजीनाट्य, निधी वाटपावरून अजितदादांवर शिवसेनेनंतर भाजपही नाराज?
तर याचबरोबर भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक संजय गोविल यांचा वेल्श फायरमध्ये 50 टक्के हिस्सा आहे. तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा खराब फॉर्म देखील त्यांना खरेदी न करण्याचे कारण असल्याचं मानले जात आहे.
पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव
तर दुसरीकडे नुकतंच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळविला होता. या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 111 चेंडूत शतक झळकावले होते.