Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) 7 व्या दिवशी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus 2024) सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 3-2 ने पराभव केला आहे. 1972 नंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदा पराभव केला आहे.
या सामन्याच्या 12 व्या मिनिटाला शानदार पद्धतीने फिल्ड गोल करत अभिषेकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. तर पुढच्या मिनिटाला म्हणजेच 13व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने गोल करत भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.
🇮🇳🔥 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 𝘄𝗮𝘆 𝘁𝗼 𝗲𝗻𝗱 𝘁𝗵𝗲 𝗴𝗿𝗼𝘂𝗽 𝘀𝘁𝗮𝗴𝗲! India stormed to victory against a strong Australian side in their final group game. A very positive sign just ahead of the knockout rounds.
🏑 Final score: India 3 – 2 Australia
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄… pic.twitter.com/rePqIy9b5X
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 2, 2024
दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूने या सामन्यात कमबॅक करत दुसऱ्या क्वार्टरच्या 10 मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने गोल करून स्कोर 2-1 वर आणला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 3-1 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने गोल केला. या सामान्याच्या 32व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करून भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
Paris Olympics 2024 मनू भाकर करणार पदकांची हॅटट्रिक ? शानदार कामगिरी करत पुन्हा फायनलमध्ये
या सामन्याच्या तीन क्वार्टरपर्यंत भारताकडे 3-1 अशी आघाडी होती. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन गोल गेल्यानंतर दुसरा क्वार्टर ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवत 3-1 अशी आघाडी घेतली होती. तर शेवटच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने गोल केला.