ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला धक्का, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय
Rohit Sharma : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघ (Team India) तिसऱ्या कसोटीसाठी मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून खेळताना दिसू शकते.
रोहित शर्माने (Rohit Sharma) नेट्समध्ये जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) नवीन चेंडूसह भरपूर सराव देखील केला आहे. त्यानंतर रोहित ब्रिस्बेन कसोटीमध्ये पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ॲडलेडमध्ये झालेल्या पिंक बॉल कसोटीमध्ये रोहितने सहाव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती मात्र या सामन्यात त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रोहित पुन्हा एकदा भारतासाठी डावाची सुरूवात करताना दिसू शकतो. तर केएल राहुल ब्रिस्बेनमध्ये सहाव्या स्थानावर खेळू शकतो.
पिंक बॉल कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्सने पराभव करत पाच सामन्यांची मालिका 1-1 ने अशी बरोबरीत आणली आहे. तर या मालिकेचे तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली होती तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला होता मात्र दोन्ही डावातील धावसंख्या जोडून त्याला फक्त 9 धावा करता आल्या. मात्र, आता ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान रोहितची विशेष तयारी पाहता तो तिसऱ्या कसोटीत डावाची सुरुवात करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे.
Captain Rohit Sharma faced Bumrah with the new ball in the nets.
[Pic – Ray Sportz] pic.twitter.com/4relrZUUf6
— Vishal. (@SPORTYVISHAL) December 12, 2024
Places of Worship Act 1991 राहणार की जाणार? आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
गुरुवारी कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाने खूप घाम गाळला. रोहितने यावेळी नवीन चेंडूसह सराव केला. रोहितने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांच्याविरुद्ध नव्या चेंडूने फलंदाजीचा सराव केला. त्यामुळे रोहित शर्मा ब्रिस्बेनमध्ये भारतासाठी डावाची सुरुवात करू शकतो.