मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, जसप्रीत बुमराहकडे मोठी जबाबदारी
India Team Announced Test Series Against New Zealand : बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
🚨NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank Test series against New Zealand announced.
Details 🔽 #INDvNZ
— BCCI (@BCCI) October 11, 2024
बीसीसीआयने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ निवडला आहे. या मालिकेचा पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुणे येथे खेळवला जाणार आहे तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
मोठी बातमी! एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाड़ीमध्ये धडक , अनेक लोक जखमी
भारताचा न्यूझीलंड दौरा
पहिली कसोटी: 16-20 ऑक्टोबर (बेंगळुरू)
दुसरी कसोटी: 24-28 ऑक्टोबर (पुणे)
तिसरी कसोटी: 1-5 नोव्हेंबर (मुंबई)