PBKS vs RCB: आयपीएलच्या 16व्या मोसमातील 27 व्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने पंजाब किंग्जचा (PBKS) 24 धावांनी पराभव करून या मोसमातील तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात पंजाब संघाला 175 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 106 धावांत पंजाब संघाने आपल्या 7 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर जितेश शर्माने सामना रोमांचक बनवला होता परंतु दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
या सामन्यात पंजाबचा संघ 18.2 षटकात 150 धावांवर गारद झाला, ज्यामध्ये जितेश शर्माने 41 आणि प्रभसिमरन सिंगने 46 धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने गोलंदाजीत सर्वाधिक 4 बळी घेतले.
सिराजची घातक गोलंदाजी
पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सिराजने विकेट घेतली नवीन फलंदाज अथर्वला बाद केले. तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या षटकापर्यंत पंजाबने मॅथ्यू शॉर्ट्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि हरप्रीत भाटिया यांच्यासह चार प्रमुख फलंदाज गमावले होते. कर्णधार सॅम करनही 10 व्या षटकात धावबाद झाला. एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. प्रभसिमनर सिंगने 30 चेंडूत सर्वाधिक 46 धावा केल्या. सिराजने चार विकेट्स घेतल्या वानिंदू हसरंगने दोन गडी बाद केले. हर्षल पटेल आणि वेन पारनेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर
फाफ आणि विराटची वादळी खेळी
फाफ डू प्लेसिस आणि कर्णधार विराट कोहली वादळी खेळी करत पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी करून संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. विराट कोहलीने 59 तर फाफने 84 धावांची उत्कृष्ट खेळी केली.
आरसीबी संघाने शेवटच्या 5 षटकांत झटपट विकेट गमावल्या, त्यामुळे संघाला 20 षटकांत 4 गडी गमावून 174 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 2 तर नॅथन एलिस आणि अर्शदीप सिंगने 1-1 विकेट घेतली.