Download App

‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई; आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल

RCB सह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करत ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई केली आहे.

Police take action against stampede at RCB rally; Case registered against RCB and Karnataka Cricket Association : आयपीएल ट्रॉफीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपलं नाव कोरलंय. याच संघाच्या सत्कारासाठी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Bangalore) चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मात्र गालबोट लागले आहे. या स्टेडियमच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर कर्नाटक पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण; अन् फडणवीसांनी सांगितली ‘त्या’ बोगद्याची खासियत

आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल…

या प्रकरणी क्युबन पार्क पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या वृत्ताला मध्यवर्ती पोलिस उपायुक्त (डीसीपी) शेखर एच टेकन्नवर यांनी दुजोरा दिला आहे. हा गुन्हा निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामध्ये आरसीबी या संघासह इतर अनेक संस्थांचा देखील समावेश आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये कलम 105 सदोष मनुष्यवध, कलम 125(12) इतरांच्या जीवाला आणि सुरक्षेला धोका निर्माण करणारी कृत्ये करणे, कलम 142 बेकायदेशीर जमाव, कलम 121 गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, आणि कलम 190 बेकायदेशी जमलेल्या जमावाची जबाबदारी या कलमांचा समावेश आहे.

12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील अन्…; अजितदादांनी मांडला समृद्धीचा हिशोब

दरम्यान या प्रकऱणी कर्नाटक हायकोर्टात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टाने या रॅली आणि चेंगराचेंगरीवरून कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने म्हटले की, या विजय रॅलीला पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना रॅली कशी काढली? त्याच बरोबर यामध्ये चाहत्यांना मोफत एन्ट्री देण्यात आली होती. असे सवाल करत कोर्टाने सरकारला हा सत्कार समारंभ आयोजित का करण्यात आला? याचे उत्तर मागितले आहे. त्यावर कर्नाटक सरकारच्या एका मंत्र्‍याने उत्तर देखील दिले आहे.

follow us