12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील अन्…; अजितदादांनी मांडला समृद्धीचा हिशोब

Samrudhi Mahamarg : देशातील सर्वांत लांब महामार्ग हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं (Samrudhi Mahamarg ) अंतिम टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. या महामार्गाच्या एकूण खर्चाबाबत चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाचा एकूण खर्चच सांगून टाकलायं. नाशिकमध्ये ते बोलत होते.
राऊतांच्या ‘नरकारतला स्वर्ग’ची भाजपमध्येही हवा; अरे व्वा! म्हणत सांगितले भाजप आमदारांचे फोन…
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तब्बल 61 हजार कोटी रुपये खर्च करुन 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरु झालायं. या समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता पण हा खर्च 61 हजार कोटींवर पोहोचला आहे. तसेच महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टिल वापरण्यात आलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय.
आरसीबीच्या रॅलीत तब्बल ५ लाख माणसं; मात्र पोलिसांची सख्या फक्त 10 हजार, कशी घडली घटना?
इगतपुरी ते कसारा प्रवास अवघ्या 8 मिनिटांत…
-17.5 मीटर रुंदी आणि 9 मीटर उंचीचा बोगदा
-बोगद्याला एकूण तीन लेन
-ताशी 100 किमीच्या वेगाने प्रवास
-भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन, लाईट रिफ्लेकटींग
-300 मीटर अंतरावर एकूण 26 क्रॉस पॅसेज
-90 मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा
-एका टनेलमध्ये 286, दोन्ही बोगद्यात 572 झोन
-100 डबल एक्सल रिव्हसेबल व्हेंटिलेशन फॅन
एकूण खर्च किती?
61 हजार कोटी रुपये
12 कोटी सिमेंटच्या बॅग्ज
7 लाख मेट्रिक टन स्टिल
13 कोटी घनमीटर भराव
8 कोटी घनमीटर खोदकाम