Pragyan Ojha : प्रज्ञान ओझा नवे मुख्य निवडकर्ता; टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल

Pragyan Ojha : माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची टीम इंडियाचे नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती

Pragyan Ojha

Pragyan Ojha

Pragyan Ojha : माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची टीम इंडियाचे नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. प्रज्ञान ओझा अजित आगरकर यांची जागा घेणार आहे. आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर रोजी संपला होता. तर दुसरीकडे रमेश पोवार यांचाही पुरुष निवड समितीमध्ये (Men’s Selection Committee) करण्यात आला असल्याची घोषणा बीसीसीआयकडून (BCCI) करण्यात आली आहे. ओझाने (Pragyan Ojha) भारतासाठी 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.

तर दुसरीकडे रमेश पोवार (Ramesh Powar) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी दोन कसोटी आणि 31 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक, तसेच मुंबई आणि गुजरात संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. ओझा आणि पोवार यांच्यासह या पाच सदस्यीय समितीमध्ये शिव सुंदर दास, आर. पी. सिंग आणि अजय रात्रा यांचाही समावेश आहे.

A Perfect Murder मधून पहिल्यांदाच साकारणार रुपाली भोसले सस्पेन्स-थ्रिलर भूमिका

वसीम जाफर यांच्या नावाची चर्चा

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, “अशोक मल्होत्रा ​​आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) पुरुष निवड समितीच्या सदस्याच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया पूर्ण केली. सीएसीने बीसीसीआय मुख्यालयात अर्जांची छाननी केली आणि उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यानंतर रमेश पोवार यांच्या नियुक्तीची शिफारस केली.” मिळालेल्या माहितीनुसार, सीएसीने चार ते पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्यामध्ये भारतासाठी 31 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळलेले माजी सलामीवीर वसीम जाफर यांचाही समावेश होता.

Exit mobile version