मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबईमधील ओशिवरा पोलिसांनी आणखी २ आरोपींना अटक करण्यात आली. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया इल्फ्यून्सर सपना गिलला (Sapna Gill) अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपीना पोलिसानी ताब्यात घेतले.
Hustle video of #Cricketer #Prithvishaw & #influencer #Sapnagill outside Barrel mansion club in vile parle east #Mumbai, it is said that related to click photo with cricketer later whole fight started. @PrithviShaw @MumbaiPolice @DevenBhartiIPS @CPMumbaiPolice @BCCI pic.twitter.com/6LIpiWGkKg
— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) February 16, 2023
पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरुन वाद ‘
मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वी शॉच्या मित्रांकडून ओशिवरा पोलिसांत हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत आता सपना गिलनंतर २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पृथ्वी शॉबरोबर सेल्फी घेण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. हा वाद नंतर हाणामारीवर येऊन पोहोचला. सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी पृथ्वी शॉ आणि मित्रांवर हल्ला केल्याचा आरोप पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ एका वादात सापडला आहे. पृथ्वी शॉचा आणि एका तरुणीचा बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या समोर आला होता. मुंबईतील एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ आणि काही जणांमध्ये बाचाबाची झाली. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शॉ एका तरुणीबरोबर भररस्त्यात बाचाबाची करताना दिसत होता. पृथ्वी शॉ आणि तरुणी यांच्यात बाचाबाची झाली होती. या प्रकरणी आता नवी अपडेट समोर आली.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेटर पृथ्वी शॉबरोबर सेल्फी घेण्यावरुन वाद झाला. यानंतर पृथ्वी शॉवर सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी हल्ला केला होता. इतकंच नाही तर त्याच्या कारच्या काचा देखील फोडण्यात आल्या. पोलिसांनी सपना गिलला अटक केली. सपना गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.