Rahul Dravid : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना नवीन जॉब मिळाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. चर्चांनुसार राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. याबाबत लवकरच घोषणा देखील होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2024 टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा भारतीय संघासोबत (Team India) कार्यकाळ संपला होता. भारतीय संघासोबत कार्यकाळ संपल्यानंतर द्रविड लीग क्रिकेटमध्ये प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडने फ्रँचायझीशी करार केला असून मेगा लिलावापूर्वी संघात कोणत्या खेळाडूंना कायम ठेवता येईल याबाबत चर्चा केली आहे.
राहुल द्रविडने 2014 आणि 2015 मध्ये राहुल द्रविड राजस्थान रॉयल्ससोबत मेंटॉर आणि संचालक म्हणून काम केले आहे. राहुल द्रविड व्यतिरिक्त, फ्रँचायझीशीसोबत भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathod) देखील जुडणार असल्याची माहिती मिळाली आहे. जेव्हा राहुल द्रविडने भारतीय संघाची मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची निवड करण्यात आली होती.
‘ते बारकाईने लक्ष देतात अन्…’, शरद पवारांकडून नितीन गडकरींचा कौतुक
तर दुसरीकडे द्रविडने राजस्थान रॉयल्सची मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली असली तर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) फ्रँचायझीचा क्रिकेट संचालक राहील तो 2021 पासून या पदावर काम करत आहे. दक्षिण आफ्रिकेतील पार्ल रॉयल्स आणि सीपीएलमधील बार्बाडोस रॉयल्स या इतर लीगमधील फ्रँचायझी संघांवर त्याची नजर असणार आहे.
‘जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आता विधानसभेत … ‘, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला