नवी दिल्ली : 2007 सालच्या विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये मिसबाह-उल-हकची विकेट घेऊन भारताला विजेतेपद मिळवून देताना जोगिंदर शर्माचा तो चेंडू आजही सर्वांच्या मनात ताजा असेल. जोगिंदर शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. जोगिंदरने ट्विटरवर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली.
जोगिंदरने भारतासाठी एकूण चार T20 आणि 4 एकदिवसीय सामने खेळले. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर तो काही वर्षे आयपीएलही खेळला.तो सध्या हरियाणामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.
जोगिंदर शर्माला हरियाणा राज्य सरकारने T20 विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 21 लाखांचे रोख बक्षीसही दिले होते. यानंतर हरियाणाच्या या क्रिकेटपटूने हरियाणातच पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला.
जोगिंदर शर्मा याने ट्विटरवर एक पत्र पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. बीसीसीआय सचिव जय शाह यांना लिहिलेल्या या पत्रात जोगिंदर शर्मा याने बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानले आहेत. जोगिंदर शर्माने त्याचे चाहते, कुटुंब, मित्रांचे आभार मानले, ज्यांनी त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांमध्ये त्याला साथ दिली. जोगिंदर शर्माने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, इतर पर्यायांचा शोध घेण्याबाबत बोलतो.