मुंबई : स्पोर्ट्सच्या जगातील रणवीर सिंगची एन्ट्री अनोखी मानली जात आहे. टाटा आयपीएल 2023 पासून रणवीर सिंग स्टार स्पोर्ट्सचा ब्रॅंड अॅंबॅसिडर असणार आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या दरम्यान जाहिराती आणि ब्रॅंडिंग धमाकेदार, रोमांचक आणि तूफानी असणार आहे. त्याच्या या नियुक्तीबद्दल सांगितले की, स्टार स्पोर्ट्स आणि पॉप कल्चर आयकॉनीक अभिनेता रणवीर सिंगमुळे हा खेळ आणि मनोरंजनाची दुनियेला नव्या क्षितिजावर घेऊन जाईल.
यावर रणवीर सिंगने देखील आपली प्रतिक्रीया दिली. तो म्हणाला की, स्टार स्पोर्ट्स एक असा ब्रॅंड आहे जो भारतात खेळांसाठी मोठा पर्याय आहे. एक क्रीडाप्रेमी म्हणून या ब्रॅंडसोबत जोडले जाणे माझ्यासाठी खूप खास आहे. वर्ल्ड स्पोर्ट्सच्या अनेक महत्त्वाचे क्षण मी स्टार स्पोर्ट्सवर पाहत मोठा झालो आहे. तर आता या प्लॅटफॉर्मच्या प्रवासाचा भाग होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असं रणवीर सिंग म्हणाला.
Mahesh Kale : ‘हा तर रेहमानच्या जीवावर उठलाय’; नेटकऱ्यांकडून महेश काळे ट्रोल
त्यामुळे रणवीर सिंगला आता खेळाविषयी प्रेम दाखवण्याची संधी आहे. तसेच त्याला आता मनोरंजन क्षेत्रासह आता खेळाच्या विश्वात देखील आपले टॅलेंट दाखवता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स आणि रणवीर सिंगच्या या प्रवासाची सुरूवात टाटा आयपीएल 2023 (31 मार्च – 2 एप्रिल) च्या ओपनिंग विकेंडपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे.