T20 World Cup Final अभिषेक आणि वरुण खेळणार का? फायनलपूर्वी रवी शास्त्रीने दिला भारतीय संघाला धाडसी सल्ला 

T20 World Cup Final : टी20 विश्वचषक 2026 चा आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

T20 World Cup Final

T20 World Cup Final

T20 World Cup Final : टी20 विश्वचषक 2026 चा आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) गेल्या काही सामन्यांपासून फ्लॉप ठरत असल्याने अंतिम सामन्यात त्यांच्या जागी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रिंकू सिंगला (Rinku Singh) संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे भारताचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताला एक धाडसी सल्ला दिला आहे. अंतिम सामन्यासाठी संघात बदल करु नका असा सल्ला त्याने भारतीय संघाला दिला आहे.

माध्यमांशी बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाला की, मला वाटते की भारतीय संघाने त्याच संघासह पुढे जावे आणि अंतिम सामन्यात कोणतेही बदल करु नये. अभिषेकला (Abhishek Sharma) अंतिम सामन्यात संधी द्या आणि त्याला सांगा की, तो फक्त त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेव आणि तुझ्या ताकदीनुसार खेळ. त्याला डबल माईंड होण्यापासून वाचवा. शेवटचा सामना तुमचा सर्वोत्तम सामना ठरू शकतो असं रवी शास्त्रीने भारतीय संघाला सल्ला दिला आहे.

तर दुसरीकडे भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup Final) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात मुंबईत इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 7 पासून सुरु होणाऱ्या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

‘या’ 5 राशींना होणार फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार ?

आज दोन्ही संघाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाने ही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे आज एक सुवर्ण संधी आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत ही स्पर्धा एकही वेळी जिंकलेली नाही मात्र त्यांना इतिहास रचण्याची एक संधी आहे.

Exit mobile version