Download App

Ravichandran Ashwin : अश्विनचा पराक्रम! इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज

IND vs ENG : Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या (IND vs ENG) मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज आर.अश्विनने मोठा (Ravichandran Ashwin) विक्रम केला आहे. या कसोटी सामन्यात एक विकेट घेताच अश्विनने 100 विकेट्स पूर्ण केल्या. आर. अश्विन हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 100 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहेत. आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

या सामन्यात अश्विनने एक विकेट घेत आपल्या शंभर विकेट पूर्ण केल्या. भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सर्वाधिक 145 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. या यादीत अश्विन आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

R Ashwin Birthday Special : आधी सलामीवीर, नंतर वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीत नाव कमावले

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. यानंतर भागवत चंद्रशेखर (23 सामने, 95 विकेट्स), अनिल कुंबळे (19 सामने, 92 विकेट्स), बिशन सिंह बेदी (22 सामने, 85 विकेट्स) आणि कपिल देव (27 सामने, 85 विकेट्स) यांचा नंबर आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीत 22 व्या ओव्हरमध्ये अश्विनने जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली. या दरम्यान जॉनीने 38 धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. नवोदित आकाशदीपने तीन विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली.

आकाशदीपने जॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद केले. यानंतर जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी डाव सावरण्याचाा प्रयत्न केला. मात्र, अश्विनने ही जोडी फोडून इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. यानंतर इंग्लंडचा डाव गडगडल्याचे दिसून आले.

Ravi Ashwin Stats: अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रमवारीत ‘हा’ करिष्मा करणारा पहिला भारतीय गोलंदाज

पहिल्याच सामन्यात 6 विकेट्स
अश्विन 2006 मध्ये हरियाणाविरुद्ध कारकिर्दीतील पहिला सामना खेळला आणि अप्रतिम कामगिरी केली. अश्विनने त्या सामन्यात 6 विकेट घेतल्या आणि त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची चांगली सुरुवात केली. 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याने 2 बळी घेतले. रविचंद्रन अश्विनने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 9 बळी घेतले. अश्विनने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.

follow us

वेब स्टोरीज