Download App

WTC Final 2023: ‘पंड्याला संघात न घेवून भारताने केली मोठी चूक’, रिकी पाँटिंगने सांगितले कारण

  • Written By: Last Updated:

India vs Australia WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांची घोषणा फार पूर्वीच झाली आहे. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता शार्दुल ठाकूरचा वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने हार्दिक पांड्याचा समावेश न करणे ही भारतीय संघाची मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.

2018 मध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, तेव्हापासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. आपला फिटनेस लक्षात घेऊन हार्दिकने आता कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रिकी पाँटिंगच्या मते, हार्दिक पांड्याला WTC फायनलसाठी भारतीय संघात समाविष्ट करायला हवे होते. आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये हार्दिकने बॅटने 346 धावा करत बॉलसह 3 विकेट घेतल्या होत्या.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

रिकी पॉन्टिंगने म्हटले आहे की, मला वाटते की भारतासाठी कसोटी सामन्यात हार्दिक पांड्यासारखा खेळाडू भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा ठरू शकला असता. मला माहीत आहे की, त्याला त्याचा फिटनेस लक्षात घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये घेतले नाही. मात्र या सामन्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे पुनरागमन करता आले असते.

हार्दिक संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो

पॉन्टिंगने आपल्या वक्तव्यात पुढे म्हंटला, इंग्लंडमधील परिस्थिती लक्षात घेता हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. फक्त या एका सामन्यासाठी त्याची संघात निवड व्हायला हवी होती आणि मग तो बॅट आणि बॉलने संघासाठी काय योगदान देऊ शकतो ते पहा.

Tags

follow us