Rising Stars Asia Cup : रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी करत अवघ्या 28 चेंडूंत शतक झळकावले आहे. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये वैभवने (Vaibhav Suryavanshi) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या (Jake Fraser-McGurk) नावावर असलेला विक्रम मोडीत काढला. मॅकगर्कने ऑक्टोबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियातील 50 षटकांच्या देशांतर्गत स्पर्धेत 29 चेंडूंत शतक झळकावले होते.
या सामन्यात आपल्या डावाची सुरुवात करताना वैभवने पहिल्या दोन चेंडूंवर कोणतीही धाव संख्या केली नाही मात्र त्यानंतर त्याने जाहिद अलीच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार ठोकले. पुढच्या षटकात त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. तिसऱ्या षटकापर्यंत त्याने अवघ्या 16 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर सिमरजीत सिंगच्या गोलंदाजीवर त्याने तीन षटकार लगावले, ज्यामुळे पाचव्या षटकापर्यंत त्याच्या भारताची धावसंख्या 100 धावांच्या पुढे गेली. वैभवने पुढील सहा चेंडूंमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याने एकूण 15 षटकारांच्या मदतीने शतकाचा टप्पा गाठला.
वैभव सूर्यवंशी शतकावरच थांबला नाही त्याने पुढील 12 चेंडूंत 150 धावांचा टप्पा गाठला. या 12 चेंडूंमध्ये सहा षटकार मारून त्याने क्रिकेटमधील सर्वात जलद 150 धावा पूर्ण केल्या, ज्यामध्ये एकूण 20 षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह, ‘लिस्ट ए’ (List A) क्रिकेटमध्ये 150 धावा करणारा तो सर्वात जलद खेळाडू ठरला आहे. त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. याआधी 2025 मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने 59 चेंडूंत 150 धावा केल्या होत्या.
🚨 VAIBHAV SOORYAVANSHI CREATES HISTORY! 🥶🔥
Smashes a hundred in just 28 balls against UAE in the Rising Stars Asia Cup, the fastest List A hundred ever!
Vaibhav alone smashed 15 sixes, while the entire UAE team managed just 5.
What a knock by this 14-year-old sensation! 🤯🏏 https://t.co/ZF6MShxtGZ
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 24, 2026
… तर 2022 मध्ये शरद पवार राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवलेंचा मोठा दावा
