Download App

Rohit Sharma : शतकासह रोहित बनला विक्रमवीर

  • Written By: Last Updated:

मुंबई – न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनेक दिवसांच्या कालावधी नंतर शतकीय खेळी करत अनेक विक्रमला गवसणी घातली आहे. रोहितने या सामन्यात 30 वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. असा कारनामा करणारा तो जगातील आणि भारतातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगच्या शतकांची बरोबरी केली आहे. या अगोदर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने हा कारनामा केला आहे

न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नमवत तीन सामन्याच्या मालिकेत क्लीन स्वीप देत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी करत इतिहास रचला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने शतकी खेळी करत सिंहाचा वाटा उचलला. यासह रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. .

रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक गमावली. न्यूझीलंडने यावेळी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी उतरले होते. यावेळी रोहितने जबरदस्त फलंदाजी करत 84 चेंडूत शतक पूर्ण केले. हे शतक करताना रोहितने 6 षटकार आणि 9 चौकार मारले. यासह रोहितने वनडे कारकीर्दीतील 30वे शतक साकारले. यासह रोहितच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

रोहित शर्माचा विक्रम

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे, सचिनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावले आहेत. 46 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकांसह विराट कोहली हा दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत रोहित 30 शतकासह तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सर्वाथिक शतके करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर – 49
विराट कोहली* – 46
रोहित शर्मा* – 30
रिकी पॉन्टिंग – 30

Tags

follow us