Download App

IND vs NZ: तिसऱ्या सामन्यात रोहित-गिलची धुवांधार शतकं, भारताची दमदार सुरुवात

इंदूर : भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळवला जात आहे. भारताच्या दोन्ही सलामीवरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धुलाई करीत दमदार शतकं झळकवली आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपल्या कारकिर्दीतील 30 वे ठोकले. तर शुभमन गिलनेही (Shubman Gill) दमदार शतक झळकवले.

26 ओव्हरनंतर भारताची अवस्था एक बाद 212 धावा अशी आहेत. रोहित शर्मा शतक करुन तंबूत परतला आहे. रोहितने 85 चेंडूत 101 धावांची खेळी केली आहे. त्याने आपल्या खेळीत सहा षटकार आणि नऊ चौकार लागवले आहेत. शुभमन गिल हा जोरदार फटकेबाजी करीत आहे. शुभमन गिल 104 धावांवर खेळत आहे. त्याने चौदा चौकार आणि चार चौकार लागवले आहेत. विराट कोहली मैदानात खेळण्यासाठी आला आहे.

तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून त्यांनी भारताला फलंदाजीस आमंत्रीत केले. दोन्ही सलामीवीरांनी जारदार फटकेबाजी करीत शतकं झळकावली आहेत.

मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्यामुळे मालिका आधीच भारताने नावावर केली आहे. त्यामुळे आज महत्त्वाच्या गोलंदाजांना संधी देत भारताने दोन बदल अंतिम 11 मध्ये केली आहे.

भारताने सध्या दमदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना संधी दिली आहे.

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल

Tags

follow us