Download App

IND vs SL : रोहित शर्मा 10 हजारी मनसबदार, सचिनला मागे टाकत बनला विक्रमवीर

Rohit Sharma: आशिया कपमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. सिक्सर किंग रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहित शर्माने 241 डावात 10 हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 22वी धाव करताच हा विशेष टप्पा गाठला.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा तिसरा वेगवान फलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 205 डावात 10 हजार धावांचा आकडा गाठला होता. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 259 डावात ही कामगिरी केली होती.

IND vs SL Toss: नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल

अशी बहरली रोहित शर्माची कारकीर्द…
रोहित शर्माने आतापर्यंत 248 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 248 एकदिवसीय सामन्यांच्या 241 डावांमध्ये रोहित शर्माने 10025 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 30 शतके आहेत. याशिवाय रोहित शर्माने 50 अर्धशकतं आहेत. रोहित शर्मा हा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव फलंदाज आहे ज्याने वनडे फॉरमॅटमध्ये द्विशतकाचा टप्पा तीनदा ओलांडला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये रोहित शर्माने 49.14 च्या सरासरीने आणि 90.30 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Tags

follow us