Mumbai Indians In Qualifier 2: मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये पोहोचली आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. क्वालिफायर 2 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल, परंतु सर्वात यशस्वी आयपीएल संघ क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल का? मुंबई इंडियन्सची आकडेवारी काय सांगते? मुंबई इंडियन्स क्वालिफायर-२ मध्ये हार्दिक पंड्याचा संघ पराभूत होईल का?
क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा मोठा विक्रम…
क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी उत्कृष्ट ठरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आतापर्यंत मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 3 वेळा खेळला आहे. ज्यामध्ये रोहित शर्माच्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे, तर एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल 2011 च्या क्वालिफायर-2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ मुंबई इंडियन्ससमोर होता, मैदान होते मुंबईचे वानखेडे स्टेडियम… पण या सामन्यात मुंबई इंडियन्सला 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आयपीएल 2013 च्या क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्ससमोर होते… मैदान कोलकाताचे ईडन गार्डन होते, पण यावेळी मुंबई इंडियन्सने कोणतीही चूक केली नाही. आणि सामना जिंकला या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव केला.
चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद
मुंबई इंडियन्स तिसऱ्यांदा क्वालिफायर-2 खेळण्यासाठी आयपीएल 2017 मध्ये उतरली होती. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्ससमोर होते, तर मैदान एम.चिन्नास्वामी होते. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे, क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करणे सोपे नाही असे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, गुजरात टायटन्ससाठी हे कठीण आहे.