Rohit Sharma Padma Shri Award : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माला आज ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात रोहित शर्माला देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. क्रिकेटमध्ये उत्कृष्ट योगदानाची दखल घेत त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रोहित शर्माला ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान
व्यावसायिक आणि वैयक्तिक कामांमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) मे महिन्यात आयोजित पहिल्या सन्मान सोहळ्याला (Rohit Sharma Padma Shri Award ) उपस्थित राहू शकला नव्हता. आज (23 जून) या कार्यक्रमाला तो पत्नी रितिका सजदेहसह उपस्थित राहिला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाण्यापूर्वी रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना अभिवादन केले. रोहित शर्माला यापूर्वी ‘खेल रत्न’ (Khel Ratna Award) पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रोहित सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 टी-20 विश्वचषक आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. तर तो 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. रोहितने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आता ते भारतासाठी केवळ एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये खेळतो. रोहितने भारतासाठी 67 कसोटी, 285 एकदिवसीय आणि 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
– Khel Ratna Award.
– Khel Ratna Award.
– Padma Shri Award.ROHIT SHARMA – THE NATIONAL ICON, THE PRIDE OF INDIA. 🇮🇳⭐ pic.twitter.com/RoJZIEFT46
— Tanuj (@ImTanujSingh) June 23, 2026
कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 4,301 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहितने 11,720 धावा केल्या आहेत, ज्यात 33 शतके आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे.तर टी-20 क्रिकेटमध्ये 4,231 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
