Rohit Sharma files complaint against Sunil Gavaskar : टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय निराशाजनक राहिला. खेळाडू निष्प्रभ ठरले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कठोर भूमिका घेत या खेळाडूंसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली. या नियमावलीवर खेळाडू नाराज असल्याची चर्चा होत असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने थेट (Rohit Sharma) माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या विरुद्ध बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टनुसार रोहितने गावस्कर यांच्या विरुद्ध बीसीसीआयकडे तक्रार दिली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सुनील गावस्कर यांनी केलेल्या वक्तव्यांनी रोहित दुखावल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. गावसकरांनी प्रमाणापेक्षा जास्त टीका भारतीय खेळाडूंवर केली त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर झाला. बाहेरच्या दबावाचा परिणाम कामगिरीवर झाला असे रोहित शर्माने तक्रारीत म्हटले आहे.
कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे ‘हे’ 5 मोठे विक्रम, अजून कोणीच मोडू शकलेलं नाही
ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) दरम्यान रोहित शर्माने तीन कसोटी सामन्यात फक्त 31 धावा केल्या. यामुळे रोहितवर प्रचंड टीका झाली होती. गावसकरांनी (Sunil Gavaskar) तर रोहितवर सडकून टीका केली होती. त्यांची हीच टीका रोहितला (Team India) जिव्हारी लागल्याचे सांगितले जात आहे. यानंतर रोहितने थेट बीसीसीआयकडे सुनील गावसकर यांची तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर बीसीसीआय काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघातील खेळाडू रणजीतही खेळत आहेत. आताच्या रणजी ट्रॉफीतही रोहितची कामगिरी निराशाजनक राहिली. जम्मू काश्मीर विरूद्धच्या सामन्यात रोहितने पहिल्या डावात फक्त 3 तर दुसऱ्या डावात 35 चेंडूत 28 धावा केल्या. या सामन्यात रोहित पूर्ण अपयशी ठरला. आता इंग्लंड विरूद्धच्या (IND vs ENG) एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा दिसणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका आहे. यानंतर 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा रोहितसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे.
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार; उपचारांसाठी ‘BCCI’ न्यूझीलंडला पाठवण्याच्या तयारीत
या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.