जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार; उपचारांसाठी ‘BCCI’ न्यूझीलंडला पाठवण्याच्या तयारीत
BCCI Backup Plan Jasprit Bumrah : पाठीचं दुखणं उद्भवल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत आजारी पडला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याची स्कॅनिंग करण्यात आली होती. (Bumrah) पण त्याच्या दुखापतीबद्दल ठोस माहिती समोर आलेली नव्हती. आता पुन्हा महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुमराहाची दुखापत गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात येणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय निवड समितीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश तर केला आहे, पण त्याच्या उपस्थितिवर अजून निश्चिती मिळाली नाही. त्यासाठी निवड समितीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी स्टार गोलंदाजासाठी बॅकअप प्लॅन तयार केला आहे.
Chetan Sharma Sting Operation: बुमराहच्या दुखापतीवर शर्मांचा बॉम्ब
वेगवान गोलंदाज हर्षित राणाला इंग्लंडविरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी संघात सामिल करून घेण्यात आलं आहे. त्यामुळे राणा आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बुमराहच्या जागी पाहायला मिळू शकतो. मात्र, राणा इंग्लंडविरूद्ध अपयशी ठरल्यास व बुमराह संघात न परतल्यास मोहम्मद सिराजला पुन्हा संघात बोलावले जावू शकते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाची वैद्यकीय टीम न्यूझीलंडमधील ऑर्थोपेडीक सर्जन डॉक्टर रोवन स्काउटन यांच्या संपर्कात आहे. बोर्ड बुमराहला उपचारासाठी न्यूझीलंडला पाठवण्याच्या विचारात आहे. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळेल याबद्दल निवडकर्त्यांना निश्चिती नाही. त्याचे रिपोर्ट्स न्यूझीलंडमधील डॉक्टरांना पाठवण्यात आले असून त्यांच्या फिडबॅकनंतर बुमराहला न्यझीलंडमध्ये उपचारासाठी पाठवायचं की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. बोर्ड वेगवान गोलंदाजाबोबत कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. निवडकर्ते त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपलब्धता डॉक्टरांच्या फिडबॅकनंतर जाहीर करतील. पण त्यांनी बुमराहसाठी स्पर्धेत बॅकअप प्लॅन तयार केला आहे.