नवी दिल्ली : आजपासून 10 वर्षांपूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदा वनडे (ODI) मॅच मध्ये सलामी दिली होती आणि या सामन्यात मोहालीमध्ये इंग्लंडविरुद्ध 83 धावा केल्या. त्या पहिल्याच मॅचने रोहितच्या कारकीर्दीला पूर्णपणे बदलून टाकले. 23 जानेवारी 2013 च्या आधी रोहित शर्मा स्वतःची क्षमता आणि कामगिरीमधील तफावत कमी करण्यासाठी संघर्ष करत होता.
या मॅच आधी झिम्बाब्वेविरुद्ध एकाच मालिकेत दोन शतके आणि इतर काही मॅचमधील अर्धशतके केली होती. पण कामगिरीतील सातत्यामुळे त्याला भारताच्या २०११ वर्ल्डकप संघातून वगळण्यात आले. त्यांनतर अठरा महिन्यानंतर तत्कालीन भारतीय कर्णधार एमएस धोनीने मुंबईकरांना एकदिवसीय सामन्यात पांढरा नवीन चेंडू घेण्यास सांगितले आणि रोहितला त्याचे खरे मैदान सापडले.
आज रोहितची एकदिवसीय कारकीर्द सर्वकालीन महान खेळाडूंच्या बरोबरीने पाहता येते.
Rohit Sharma completed 10 years as an full-time opener in the ODI format, the turn-around in the career of hitman.
He has scored 7663 runs at an average of 55.93 & strike rate of 92.71 as an opener, the biggest highlight was his performance in the 2019 ODI World Cup. pic.twitter.com/SgUgGtFP34
— Johns. (@CricCrazyJohns) January 24, 2023