Download App

RR vs RCB: आरसीबीचे राजस्थानसमोर 172 धावांचे लक्ष्य, फाफ-मॅक्सवेलचे अर्धशतके

  • Written By: Last Updated:

RR vs RCB: आज IPL 2023 चा 60 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा केल्या. राजस्थानला या मोसमातील सातवा विजय मिळवायचा असेल तर त्यांना 172 धावा कराव्या लागतील.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात जेमतेम झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या होत्या. बंगळुरूला पहिला धक्का 7 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बसला. केएल आसिफने फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. विराटने 19 चेंडूत 18 धावा केल्या. या डावात त्याने एक चौकार मारला.

यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली. 15व्या षटकातील 5व्या चेंडूवर केएम आसिफने RCB ला धक्का दिला. त्याने फाफला बाद केले. आरसीबीच्या कर्णधाराने 44 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. पुढच्याच षटकात आरसीबीला तिसरा धक्का बसला. महिपाल लोमरर काही विशेष करू शकला नाही आणि 2 चेंडूत 1 धावा काढून झाम्पाचा बळी ठरला.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय; कुस्ती संघटनेचे ‘ते’ सर्वच पदाधिकारी अपात्र

16व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झाम्पाला दुसरी विकेट मिळाली त्याने दिनेश कार्तिकला एलबीडब्ल्यू आऊट केले. कार्तिकने 2 चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संदीप शर्माने मॅक्सवेलला बोल्ड केले. मॅक्सवेलने 33 चेंडूत 54 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. मॅक्सवेल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करत होता. मायकेल ब्रेसवेल 9 धावा करून नाबाद राहिला आणि अनुज रावतने 29 धावा केल्या.

Tags

follow us