Download App

SA vs WI: दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात धावांचा पाऊस; विंडीजने जिंकली मालिका

  • Written By: Last Updated:

जोहान्सबर्ग : वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन टी-20 सामन्याची मालिका जिंकली आहे. मंगळवारी (28 मार्च) जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात विंडीजने आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत. आठ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिका 2 -1 ने जिंकली आहे. शेवटच्या वेळी 2015 मध्ये त्यांनी मालिका जिंकली होती. त्यावेळीही विंडीजने आफ्रिकेच्या भूमीवर मालिका जिंकली होती. दोन्ही संघांमधील ही पाचवी T20I मालिका होती.

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने 20 षटकांत आठ गडी गमावून 220 धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र त्यांनी 20 षटकांत 6 गडी बाद 213 धावा केल्या. या सामन्यात 40 षटकात एकूण 433 धावा झाल्या. त्यामुळे आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव झाला.

काइल मेयर्सने 17, अल्झारी जोसेफने 14, जेसन होल्डरने 13 आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने 11 धावांचे योगदान दिले. रोस्टन चेसला केवळ सहा धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी अँगिडी, कागिसो रबाडा आणि एनरिच नोर्टजे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्णधार एडन मार्करामला ब्रेकथ्रू मिळाला.

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्येही धावांचा पाऊस पडला होता. या सामन्यात 40 षटकात एकूण 517 धावा झाल्या होत्या. वेस्ट इंडीजने 258 आणि दक्षिण आफ्रिकेने 259 धावा केल्या होत्या हा सामना आफ्रिकेने 6 गडी राखून जिंकला होता.

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठा धक्का; व्यवहारांवर द्यावे लागणार चार्जेस

रीझा हेंड्रिक्सची खेळी व्यर्थ गेली

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 10.5 षटकांत 2 बाद 112 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा क्विंटन डिकॉक 21 आणि रिलो रुसो 42 धावांवर बाद झाले. डेव्हिड मिलरची बॅट चालली नाही. तो 11 धावा करून बाद झाला. 149 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर सलामीवीर रीझा हेंड्रिक्ससह कर्णधार मार्करामने संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. हेंड्रिक्स आपले शतक पूर्ण करू शकला नाही. तो 44 चेंडूत 83 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले.

बाळासाहेब, वाजपेयींना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, सावंत बरळले… 

हेंड्रिक्स बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 18.1 षटकांत 4 बाद 186 अशी होती. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 11 चेंडूत 35 धावांची आवश्यकता होती. मार्करामने 18 चेंडूत नाबाद 35 धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला. हेन्रिक क्लासेनने दोन चेंडूंत सहा आणि वेन पारनेलने दोन चेंडूंत दोन धावा केल्या. ब्योर्न फॉर्च्युन एका चेंडूवर खाते न उघडता नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने पाच विकेट घेतल्या. जेसन होल्डरने 1 विकेट घेतली.

Tags

follow us