SA vs WI: मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 259 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18.5 षटकात 4 विकेट गमावत 259 धावा करत सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय T20 इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 258 धावा केल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर सामना जिंकण्यासाठी 259 धावांचे लक्ष्य होते, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विक्रमी धावांचा पाठलाग करत सामना जिंकला.
क्विंटन डी कॉकच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विक्रमी धावांचे आव्हान पूर्ण केले
दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावले. क्विंटन डी कॉकने 44 चेंडूत 100 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार मारले. याशिवाय रेझा हेन्रिक्सने अवघ्या 28 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार इडन मार्कराम 21 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर रिले रुसोने 4 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. हेन्रिक क्लासेन 7 चेंडूत 16 धावा करत नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.
वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने शतक झळकावले
वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 विकेट गमावत 258 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने शानदार शतक झळकावले. जॉन्सन चार्ल्सने 46 चेंडूत 118 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 11 षटकार मारले. तर कायली मेयर्सने 27 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी रोमेरी शेफर्डने 18 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेन पारनेलने 4 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. तर मार्को जोन्सेनने 4 षटकात 52 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले.