Download App

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा परवानगीशिवाय गैरवापर, अज्ञातांविरुध्द FIR दाखल

Sachin Tendulkar reached the police station : भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सचिनचे नाव, फोटो आणि आवाज वापरून त्याच्या परवानगीशिवाय वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यात आल्याची बाब समोर आली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जगातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेऊन अनेक वर्ष उलटली आहेत. मात्र, अजूनही सचिनची ब्रँड व्हॅल्यू जराही कमी झालेली नाही. यामुळे आजही अनेक कंपन्या सचिनला त्यांच्या ब्रँडशी जोडण्यासाठी धडपडत आहेत. पण नुकताच सचिनचे नाव, फोटो आणि आवाज वापरून त्याच्या परवानगीशिवाय वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळं सचिन तेंडुलकरची प्रतिमा डागाळल्या गेली आहे. परवानगीशिवाय सचिनचे नाव, फोटो आणि आवाज वापरण्याचा हेतू सर्व औषधी उत्पादनांची जाहिरात करणं हा होता. दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘sachinhealth.in’ या वेबसाइटवर माहिती देण्यात आली. या वेबसाइटचे नाव थेट सचिनशी जोडलेले असावे. या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी वेबसाइट सचिन तेंडुलकरच्या छायाचित्रांचा गैरवापर करत होती. सचिनच्या एका सहकाऱ्याने ही तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, तक्रारदाराला ही जाहिरात सचिनच्या नावाने ऑनलाइन आढळून आली. त्यानंतर ही गोष्ट सचिन तेंडुलकरला समजली. त्यानंतर सचिनने थेट पोलिस ठाणे गाठून संबंधित लोकांची तक्रार दाखल केली. आपण या कंपनीला कधीही आपले नाव आणि फोटो वापरू दिले नाही. त्यामुळे आपली प्रतिमा डागाळली असल्यचां सचिनने तक्रारीत सांगितलं.

Zero Shadow Day : कुठे पाहता येणार शून्य सावली दिवस, जाणून घ्या…

सचिनने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक), ४६५ आणि ५०० अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होता, सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. सचिन मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे.

Tags

follow us