Sachin Tendulkar at Sharjah 22 April 1998 : सचिन तेंडूलकरला भारतामध्ये क्रिकेटचा देव मानले जाते. त्याने भारतासाठी असंख्य लक्षात राहणाऱ्या इनिंग खेळल्या आहेत. अशीच एक त्याची इनिंग 1998 साली शारजाह या मैदानावर प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. 25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 22 एप्रिलला सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध 131 बॉलमध्ये 143 धावांची तुफानी खेळी केली होती. सचिनने या धमाकेदार इनिंमध्ये 9 चौके 5 छक्के लगावले होते.
त्याच्या या इनिंगच्या निमित्ताने मुंबईत आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्याने आपल्या भावना बोलून दाखवल्या. तो म्हणाला, “मला वाटत नाही की मी जे काही साध्य करू शकलो ते तुमच्या पाठिंब्याशिवाय तसेच प्रेम आणि आपुलकीशिवाय शक्य झाले असते. त्या सकारात्मक ऊर्जेने मला बाहेर जाऊन भारतासाठी जे काही केले ते करण्याचे बळ दिले. भारतासाठी खेळावं, ती सुंदर ट्रॉफी उचलावी, त्या स्वप्नाचा जन्म 1983 मध्ये झाला. तेथून ते 2011 पर्यंत, माझ्या आयुष्यात फक्त एकच इच्छा होती – ती सुंदर ट्रॉफी हातात घेण्याची, असे त्याने आजच्या कार्यक्रमात म्हटले आहे.
#WATCH | On 25 years of his historic 'Desert Storm' innings in Sharjah against Australia in 1998, Sachin Tendulkar interacts with fans at an event in Mumbai.
He says, "I don't think whatever I have been able to achieve would have been possible without your support, love &… pic.twitter.com/aHrNaQKfrA
— ANI (@ANI) April 22, 2023
सचिनच्या या खेळीला डेजर्ट स्टॉर्म या नावाने देखील ओळखले जाते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 285 धावांचे लक्ष ठेवले होते. यानंतर भारत बॅटींगला आला त्यावेळेस मैदानात मातीचे वादळ आले. त्यामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला. पण यानंतर जेव्हा सामना सुरु झाला तेव्हा सचिन तेंडूलकर नावाचं वादळ मैदानात आलं व त्यानं संपूर्ण ऑस्ट्रेलिया टीमला उडवून लावलं.
यावेळी सचिन सौरभ गांगुलीसोबत ओपनिंग करण्यासाठी आला होता. जणू काही सचिन मैदानात यायच्या आधीच यांची धुलाई करायची असे ठरवून आला होता. या सामन्यात त्याने शेन वॉर्न, माइकल कास्प्रोविच, स्टीव वॉ, टॉम मूडी यांच्यापैकी कुणालाही सोडले नाही. यानंतर शेन वॉर्न याने मला स्वप्नात देखील सचिन दिसतो, असे जाहीर कबूल केले होते. भारतीय संघाला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला पण रन-रेटच्या आधारावर भारताने फायनल गाठली.