मुंबई : वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) याचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण २४ एप्रिल दिवशी सचिन तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसाला किंवा यंदाच्या विश्वचषकाच्या दरम्यान केले जाऊ शकते अशी माहिती क्रिकेट अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सचिन तेंडुलकरने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि १ T-20 सामना खेळला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि धावा ३४३५७ करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनने (MCA) हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर सचिन तेंडूलकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
https://letsupp.com/mumbai/holding-hand-of-girl-without-any-sexual-intent-not-sexual-harassment-bombay-high-court-18626.html
वानखेडे स्टेडियममधील हा पहिला पुतळा असणार आहे, तो कुठे स्थानापन्न करायचा हे लवकरच ठरवणार आहेत. तेंडुलकर भारतरत्न आहे. त्याचं क्रिकेटमधील योगदान सर्वांना माहिती आहे. त्याच्या ५० व्या वाढदिवशी हे MCA कडून एक लहानशी भेट असणार आहे. ३ आठवड्यांपूर्वीच सचिनने यासाठी परवानगी दिली आहे.”
वानखेडे स्टेडियममध्ये सध्या सचिनचे नाव असलेला स्टँड आहे. एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचा स्टँड उभारून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होत. देशात क्रिकेटपटूंचे पुतळे स्टेडियममध्ये नाहीत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, आंध्रमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताचे माजी महान फलंदाज सी के नायडू यांचे असे तीन स्वतंत्र पुतळे आहेत.