Marriage Anniversary : सचिनला मिळाले गिफ्ट, लखनौवरील विजयानंतर मानले मुंबई इंडियन्सचे आभार

  मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने बुधवारी त्याचा 28 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात MI ने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला तेव्हा क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी हा आनंद द्विगुणित झाला. “This is the best anniversary gift that I can get.” 🎁 𝐓𝐡𝐞 𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫 𝐁𝐥𝐚𝐬𝐭𝐞𝐫 sums up […]

25_05_2023 Sachin_tendulkar_23423131

25_05_2023 Sachin_tendulkar_23423131

 

मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने बुधवारी त्याचा 28 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात MI ने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला तेव्हा क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी हा आनंद द्विगुणित झाला.

प्रथम फलंदाजी करताना कॅमेरून ग्रीनच्या 23 चेंडूत 41 धावा आणि सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 8 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आकाश मधवालच्या 5 विकेट्समुळे एलएसजीला 101 धावांत गुंडाळण्यास मदत झाली.

मुंबई इंडियन्सने व्हिडिओ ट्विट केला

मुंबई इंडियन्सने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये संघाच्या सह-मालक नीता अंबानी यांनी तेंडुलकरला एमआयच्या विजयावर काही शब्द बोलण्यास सांगितले. त्याच्या वलग्नाचा वाढदिवसानिमित्त ही सर्वोत्तम भेट असल्याचे सचिनने सांगितले. तसेच, सचिनने ग्रीन आणि सूर्या यांच्यातील भागीदारीचे कौतुक केले.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

सचिनने केले मधवालचे कौतुक

चेपॉक येथील खेळपट्टीवर बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, गेल्या सामन्यापेक्षा ही विकेट वेगळी होती. या खेळपट्टीवर 182 ही चांगली धावसंख्या होती. रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणाचेही कौतुक झाले. तसंच अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मधवालचे अभिनंदन केले.

एलिमिनेटर सामन्यात लखनौचा पराभव केला

मुंबईने प्रथमच एलिमिनेटर सामना खेळला होता. या सामन्यात संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करत विजय मिळवला. बाद फेरीच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आम्हाला खात्री आहे की आम्ही हे करू शकू. कारण आपण यापूर्वीही हे केले आहे.

Exit mobile version