Download App

SAFF Championship : भारताचा रोमहर्षक सामन्यात शानदार विजय; टीम इंडियाचं चॅम्पियनशिपचं लक्ष्य

SAFF Championship : भारतीय फुटबॉल संघाने(Indian Football Teams) रोमहर्षक सामन्यात शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या (SAFF Championship 2023) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाची दमदार खेळी पाहायला मिळाली. भारतीय टीमने पेनल्टी शुटआऊटमध्ये लेबनॉनचा 4-2 असा पराभव करुन सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या 4 जुलैला भारतीय फुटबॉल टीमचा कुवैतविरुद्ध (Kuwait)विजेतेपदासाठी सामना होणार आहे.(SAFF Championship 2023 india football team win penalty shootout semi final sunil chhetri sport)

मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार पाऊस; कोकणसह पुण्याला यलो अलर्ट

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत लेबनॉनचा 4-2 अशा फरकाने पराभव केला. भारत-लेबनॉन सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांपैकी एकालाही गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अधिकच्या वेळेत खेळला गेला. त्यात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.

या विजयानंतर टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. 90 मिनिटांच्या वेळानंतरही सामना 0-0 असा संपल्यामुळे जास्तीच्या वेळेत तो खेळला. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांपैकी एकालाही गोल करता आला नाही. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये याचा निर्णय लागला.

जखमी असूनही नॅथन लायन एका पायावर खेळला, पाहा व्हिडिओ

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या शानदार कामगिरीने सामना जिंकला. आता भारतीय फुटबॉल संघाचा अंतिम सामना 4 जुलैला कुवेत संघाबरोबर रंगणार आहे.

Tags

follow us