Download App

प्रेक्षकांचे लज्जास्पद कृत्य, शमीला पाहताच लगावले ‘जय श्रीराम’चे नारे

मुंबई : भारत व ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे हा सामना सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावजलेले अहमदाबाद येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जातो आहे. मात्र या सामन्यात प्रेक्षकांकडून एक लज्जास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा मैदानावर उतरला असता प्रेक्षकांकडून जय श्रीराम नावाच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा कसोटी सामना सध्या खेळवला जात आहे. यातच प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामूळे सध्या वाद निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे खेळाडू टी ब्रेकनंतर मैदानावर पोहचले असता सूर्यकुमार यादवला पाहताच स्टेडियममधील प्रेक्षक सूर्या सूर्या असे ओरडू लागले. प्रेक्षकांकडे पाहत त्याने देखील त्यांना हात दाखवला.

संसद टेलिव्हिजनमध्ये नोकरीची संधी; महिन्याला मिळणार 1, 77, 500 रुपये पगार

त्यानंतर सुर्यकुमार यादवच्या बाजूला उभा असलेला भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला पाहून प्रेक्षकांनी जय श्री राम, जय श्री राम जय श्री राम असे नारे लगावणं सुरु केलं. प्रेक्षक एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट शमीचं नाव घेऊन जय श्री राम नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रेक्षकांच्या या नाऱ्यांकडे दुर्लक्ष करत शमीने मैदानाकडे निघून गेला. आपल्याच खेळाडूला प्रेक्षकांकडून मिळालेली वागणुक पाहता क्रिकेट चाहते नाराज झाले आहे.

भारतात फक्त छत्रपती संभाजीराजांचाच उदो उदो होईल; फडणवीसांनी ठणकावले!

अशी घटना शमीसोबत पहिल्यादांच घडली नसून यापूर्वीही 2021 च्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध हरला होता, तेव्हा सोशल मीडियावर काहींनी शमीला या पराभवासाठी दोषी मानले होते. झालेल्या प्रकारानंतर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या खेळाडूंनी शमीचे समर्थन करत त्याची बाजू मांडली होती.

Tags

follow us

वेब स्टोरीज