Sharad Pawar Cricket Museum : मुंबई केवळ आर्थिक राजधानी म्हणून नव्हे तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते .सुट्टीच्या दिवशी मैदानावर मोकळ्या जागांवर हजारोंच्या संख्येने खेळणारी तरुणाई पाहिली की शहरातील क्रिकेटप्रेमाचा प्रत्यय येतो. याच परंपरेला जपण्यासाठी आणि भविष्यातील पिढीसमोर क्रिकेटचा सुवर्ण इतिहास ठेवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोशियनने वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट संग्रहालय उभारण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि ती प्रक्रिया पूर्ण होताना आपल्याला दिसते आहे.
रविवारी क्रिकेट प्रेमींसाठी (Sharad Pawar Cricket Museum) आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे संग्रहालय खुले करण्यात येणार आहे. या संग्रहालयात देशात आणि जगभरात नावाजलेल्या खेळाडूंची माहिती आणि त्यांच्या कारगिल तिची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. अनेक वर्ष शरद पवार (Sharad Pawar) हे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते बी सी सी आय आशियातील क्रिकेट परिषद आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्य केले आहे.
सौभाग्याचे प्रतीक की दुसरं काही…, दिवाळीत जुगार खेळण्याची परंपरा कशी सुरु झाली?
क्रिकेट प्रशासनातील या योगदानाची दखल घेऊन संग्रहालयाला शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमींसाठी ही प्रेरणादायी पर्वणी ठरेल.
Garib Rath Train : मोठी बातमी! अमृतसर-सहरसा गरीब रथ ट्रेनला आग