टी-20 च्या कर्णधारपदावरून सूर्यकुमारला का हटवलं?, निवड समिती प्रमुख आगरकर काय म्हणाले?

भारताला विश्वचषक जिंकवून देणारा हा खेळाडू दोन वर्षाच्या आतच कर्णधारपदावरून हटवला आहे.

Suryakumar

टी-20 च्या कर्णधारपदावरून सूर्यकुमारला का हटवलं?, निवड समिती प्रमुख आगरकर काय म्हणाले?

संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जिंकून दिल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. (Sports) सूर्यकुमार यादवच्या हाती टी-20 संघाची धुरा सोपवली होती. जुलै 2024 मध्ये सूर्यकुमार यादव भारताचा पूर्णवेळ टी-20 कर्णधार झाला. दरम्यान, भारताला विश्वचषक जिंकवून देणारा हा खेळाडू दोन वर्षाच्या आतच कर्णधारपदावरून हटवला आहे.

बीसीसीआयने 6 जून रोजी श्रेयस अय्यरची भारताच्या टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा केली. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 क्रिकेटमध्ये नवा केला. द्विपक्षीय मालिका असो किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धा, भारतीय संघाने सातत्याने यश मिळवलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नऊ मालिका आणि स्पर्धा जिंकल्या.

टीम इंडियात आता सरपंच राज! श्रेयस अय्यर टीम इंडियाचा15 वा टी-20 कर्णधार

कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेल्या सूर्यकुमार यादवची वैयक्तिक फलंदाजी मात्र सातत्याने घसरत गेली. मनगटाच्या दुखापतीच्या समस्येमुळं गेल्या 18 महिन्यांत त्याची बॅट शांत राहिली. त्यावर अजित आगरकर म्हणाले की, सूर्याबाबत हा निर्णय खरोखरच कठीण होता. नुकताच आपण विश्वचषक जिंकला आहे, पण प्रत्येक विश्वचषकानंतर संघाच्या पुढील वाटचालीचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घ्यावा लागतो.

सूर्यकुमार यादवचा वैयक्तिक फॉर्म हा एक मुद्दा होता, पण त्याचबरोबर पुढील दोन वर्षांचा, किंबहुना पुढील विश्वचषकापर्यंतच्या कालावधीचा विचार करून आम्हाला हा निर्णय योग्य वाटला. मी आधीही म्हटल्याप्रमाणे, श्रेयस अय्यर कर्णधारपदासाठी पूर्णपणे पात्र आणि योग्य निवड आहे असं आगरकर यावेळी म्हणाले.

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

Exit mobile version