Shubman Gill : ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमनची सारा तेंडूलकरसोबत का होते चर्चा?

Shubman Gill :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus )  यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या सुरु आहे. आजच्या दिवशी भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill )  याने दमदार शतक झळकावले आहे. त्याने आजच्या सामन्यात 235 बॉल्समध्ये 128 धावा  केल्या आहेत. त्यामुळे ट्विटरवर सध्या शुभमन ट्रेंड होत आहे. पण शुभमनचे नाव बऱ्याचदा क्रिकेटचा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 11T172715.127

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 11T172715.127

Shubman Gill :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus )  यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या सुरु आहे. आजच्या दिवशी भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill )  याने दमदार शतक झळकावले आहे. त्याने आजच्या सामन्यात 235 बॉल्समध्ये 128 धावा  केल्या आहेत. त्यामुळे ट्विटरवर सध्या शुभमन ट्रेंड होत आहे. पण शुभमनचे नाव बऱ्याचदा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकर याची कन्या सारा तेंडूलकर ( Sara Tendulkar ) हिच्याशी जो़डली जाते.

14 फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन डे च्या दिवशी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सारा तेंडूलकर व शुभमन गिलचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोत ते दोघेही जण लंडनच्या एका कॅफेमध्ये दिसत होते. या दोघांनी एकत्रितपणे त्यांचे फोटो पोस्ट केलेले नव्हते. त्यांनी स्वतंत्रपणे आपले फोटो शेअर केले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी या दोघांचे नक्की अफेअर सुरु आहे, अशी चर्चा रंगवली होती.

India vs Australia 4th Test : शुबमन गिलने अहमदाबाद कसोटीत ठोकले शतक, तीन महिन्यांत झळकावले पाच शतक

याआधी भारताची न्यझीलंडच्या विरुद्ध हैद्राबाद येथे मॅच सुरु होती. त्यावेळी शुभमन जेव्हा मैदानात आला तेव्हा प्रेक्षकांनी सारा-सारा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली होती. या घोषणा देणाऱ्यांवर शुभमनने फार लक्ष दिले नव्हते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Rakhi Sawant ने फ्युचर प्लॅनिंग बद्दल केला खुलासा, म्हणाली…

दरम्यान सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरु आहे. या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या अखेरच्या व चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या आहेत. त्याच्या उत्तरात भारताची धावसंख्या 3 बाद 289 अशी आहे. शुभमन गिलने 128 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली 59 धावांवर खेळत आहे.

 

Exit mobile version