Rakhi Sawant ने फ्युचर प्लॅनिंग बद्दल केला खुलासा, म्हणाली…

Rakhi Sawant ने फ्युचर प्लॅनिंग बद्दल केला खुलासा, म्हणाली…

मुंबई : राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. नुकतच राखी सावंतच्या आईचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे राखीच्या वैवाहिक आयुष्यातही विरजण पडल्याचं दिसत आहे. राखी सावंतचा पती आदिल सध्या कारागृहात आहे. राखीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती.

या सगळ्यात राखीने तिच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दलच्या गोष्टी मिडियासोबत शेअर केल्या आहेत. राखी आदिलला घटस्फोट देणार नसल्याचं म्हणाली आहे. शिवाय ती मुलांनाही जन्म देणार नाही. तर राखीच्या अकॅडमीमधील विद्यार्थीच आता तिची मुलं असतील असं म्हटलं आहे. राखीने नुकतच दुबईत तिचं अॅक्टिंग अकॅडमी सुरु केलय. आणि या अॅक्टिंग स्कूलमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिने खास प्लॅनिंग केलय. या अकॅडमीमधून पास होणाऱ्या विद्यार्थांना ती बॉलीवुडमध्ये काम देणार असल्याचं म्हणाली आहे.

Satish Kaushik Death : सतिश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद?

राखीच्या आयुष्यात सतत काहीना काही घडत असतानाही ती स्वत:च्या करिअरची गाडी रुळावर आणत असल्याचं देखील म्हणाली आहे. नुकतच तिचं नवीन गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. झुठा असं या गाण्याचं नाव असून, आदिल सोबतच्या तिच्या नात्यावर आणि तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर हा व्हिडीओ आधारित असल्याचं दिसत आहे. राखी सावंत यावर्षी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली होती. या कार्यक्रमातून तिने पुन्हा एकदा ती एन्टरटेन्मेंट क्विन असल्याचं सिद्ध केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube