अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. तिसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र सुरू आहे. भारताने पहिल्या डावात 2 बाद 198 धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि विराट कोहली ही जोडी नाबाद आहे. गिलने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले असून, तीन महिन्यांत त्याने 5 वे शतक झळकावले आहे.
चेतेश्वर पुजारा 42 धावा करून बाद झाला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. पुजाराच्या आधी 35 धावा करून कर्णधार रोहित शर्मा बाद झाला.
Campa Cola पुन्हा बाजारात, रिलायन्सने तीन फ्लेवर्स लाँच केले, पेप्सी-कोका कोलाशी स्पर्धा
भारतीय फलंदाजांनी दिवसाची सुरुवात 36/0 अशी केली. पहिल्या दिवशी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर आटोपला होता.
शतकवीर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 248 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने टीम इंडियाला पहिल्या धक्क्यातून सावरले. संघाने 74 धावांवर रोहित शर्माची विकेट गमावली होती, रोहित शर्मा 35 धावा करून बाद झाला. रोहितने गिलसोबत 126 चेंडूत 74 धावांची सलामी दिली.
आता आंब्यांची खरी चव चाखायला मिळणार! FSSAI कडून नवीन आदेश जारी
अहमदाबाद कसोटी सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. सामना हरल्यास किंवा अनिर्णित राहिल्यास भारताला श्रीलंका-न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. ऑस्ट्रेलियाने आधीच अंतिम फेरी गाठली आहे.