ODI Batting Rankings: एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलची मोठी झेप

मुंबई – न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावा केल्यानंतर शुभमन गिल फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मध्ये सामील झाला आहे. त्याने रनमशीन विराट कोहलीलाही मात दिली आहे. कोहली आता सातव्या स्थानावर घसरला आहे. शतकाच्या जोरावर रोहित शर्माही टॉप-10 मध्ये आला आहे. शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत […]

Untitled Design (31)

Untitled Design (31)

मुंबई – न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावा केल्यानंतर शुभमन गिल फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मध्ये सामील झाला आहे. त्याने रनमशीन विराट कोहलीलाही मात दिली आहे. कोहली आता सातव्या स्थानावर घसरला आहे. शतकाच्या जोरावर रोहित शर्माही टॉप-10 मध्ये आला आहे.

शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे एकदिवसीय क्रमवारीत 26व्या स्थानावर लांब झेप घेतली होती. न्यूझीलंडविरुद्ध 180 च्या सरासरी फलंदाजी करत त्याने 3 सामन्यात 360 धावा केल्या आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार जिंकला आणि एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली.

शुभमनने आतापर्यंत फक्त 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 73.76 च्या उत्कृष्ट सरासरीने 109.80 च्या स्ट्राइक रेटसह 1254 धावा केल्या. सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आपल्या या छोट्याश्या कारकिर्दीत त्याने दुहेरी शतकासह 4 शतके झळकावली आहेत.

एकदिवसीयमधील टॉप चे 10 फलंदाज

बाबर आझम – 887 गुण
रसिन वंडर दुसेन – 766 गुण
क्विंटन डी कॉक – 759 गुण
डेव्हिड वॉर्नर – 747 गुण
इमाम उल हक – 740 गुण
शुभमन गिल – 734 गुण
विराट कोहली – 727 गुण
स्टीव्ह स्मिथ – 719 गुण
रोहित शर्मा – 719 गुण
जॉनी बेस्टो – 710 गुण

Exit mobile version