हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने 19 चौकार आणि 9 षटकार लगावत दमदार फलंदाजी करत शानदार द्विशतक झळकावले. गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले आहे.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने केली या दोघांनी सावध खेळी करत पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली.
कर्णधार रोहित शर्मा 34 धावा करुन बाद झाला. शुभमन गिलने शानदार द्विशतक करून 208 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला रनमशीन अर्थात विराट कोहली काही खास करू शकला नाही. तो केवळ 8 धावा करून बाद झाला. विराटनंतर ईशान किशनने देखील 5 धावा करून बाद झाला.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने शुभमनला चांगली साथ देत चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. भागिदारी जमली असे वाटत असताना सुर्या 31 धावा करून बाद झाला. तर हार्दिक पांड्या 28, वॉश्गिंटन सुंदर 12 ने धावांचे योगदान दिले, शार्दूल ठाकूर 3 धावाकाढून धावबाद झाला. कुलदीप यादव 3, तर मोहमद शमी 2 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत फर्ग्युसन, स्टँनर, टिकणर, यांनी प्रत्येकी 1 विकेट तर डॅरेल मिचेल आणि हेनरी शिंपलेने प्रत्येकी 2 जणांना बाद केले. 50 षटकानंतर भारताची धावसंख्या 8 बाद 349 झाली.