Download App

Women T20 World Cup : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार स्मृती मंधानला दुखापत !

Women T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. 10 फेब्रुवारीपासून ICC महिला T20 विश्वचषक सुरूवात होणार आहे. भारतीय महिला संघाला 12 फेब्रुवारीला पाकिस्तान महिला संघाविरुद्ध पहिला सामना खेळवला जाणार  आहे. (India Womens Cricket Team) याअगोदरच टीम इंडियाला उपकर्णधार स्मृती मंधानामुळे (Smriti Mandhana) मोठा धक्का बसू शकतो, ती बोटाच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची सुरुवात धमाकेदारपणे करायची आहे, (Womens T20 World Cup 2023) या परिस्थितीत स्मृती मानधना या सामन्यातून बाहेर राहिल्यास संघाच्या फलंदाजीवर मोठा दबाव निर्माण होऊ शकणार आहे. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान झाली होती.

त्याचवेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे. खरं तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेली नाही.

या T20 विश्वचषकात भारतीय महिला संघाला गट-ब मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये संघ 12 फेब्रुवारीला पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे, तर 15 फेब्रुवारीला भारतीय महिला संघाचा दुसरा सामना पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध होणार आहे. वेस्ट इंडिज महिला संघ यानंतर १८ फेब्रुवारीला संघ इंग्लंडविरुद्ध खेळेल आणि त्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांच्या संघातील शेवटचा सामना आयर्लंडच्या महिला संघाशी होणार आहे.

Tags

follow us