Sourav Ganguly joins politics : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही (Sourav Ganguly) आता क्रिकेटनंतर राजकारणातही नशीब आजमावणार आहेत. गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची भेट घेतली आहे. तो तृणमूल काँग्रेस (TMC) च्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
वृत्तानुसार, आज सौरव गांगुलीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सचिवालयात सुमारे अर्धा तास भेट घेतली. दादा पश्चिम बंगालमधील कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली गेल्या काही कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. कोलकाता येथे बंगाल ग्लोबल बिझनेस समिट 2023 दरम्यान गांगुलीला “बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर” म्हणून घोषित करण्यात आले होते.
नरेंद्र मोदींवर टीका करताना विचारपूर्वक बोला, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना निर्देश
वर्षभरापूर्वी इच्छा नसतानाही सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्याच्या जागी माजी गोलंदाज रॉजर बिन्नी यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
‘आमचे उमेदवार निवडून येण्यावरच लक्ष’; भुजबळांनी सांगितली रणनीती
वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत सौरव गांगुलीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून राजकारणात उतरवायचे होते. पण दादाने तेव्हा राजकारणात येण्यास नकार दिला होता. परिणामी, विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आणि टीएमसीने निवडणुकीत बाजी मारली होती.
दरम्यान मधल्या काळात गांगुलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी, सुकांत मजुमदार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत घरी जेवण करताना दिसला होता. त्यानंतर गांगुलीची भाजपसोबत जवळीक असल्याच्या अफवा वाढल्या सुरु झाल्या होत्या.