‘शाहु महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’; सतेज पाटलांची टीका
Satej Patil News : शाहु महाराजांवर (Shahu Maharaj) टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याची जहरी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर शाहु महाराजांवर भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना सतेज पाटलांनी मुश्रींफावर टीका केलीयं.
नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर शस्त्रकिया; भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशन बनले देवदूत
सतेज पाटील म्हणाले, छत्रपती शाहु महाराजांना देशाला समतेचा संदेश दिला आहे. त्यांच्याच विचारांवर आज शाहु महाराज चालत असून हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न आहे. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्दीची आम्हाला कीव येत असून वैयक्तिक टीका करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देणार असल्याचा इशाराही सतेज पाटील यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते मुश्रीफ?
शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये. आम्ही त्यांना याबाबत विनंती देखील केली आहे. कारण जनतेची तशी इच्छा आहे की, शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये, असं मुश्रीफांनी म्हटलं होतं.
Lok Sabha : जागावाटपासाठी खलबतं! 13 खासदारांसाठी CM शिंदेंची विनंती, शाह म्हणाले…
आगामी लोकसभा निवडणुकीत शाहु महाराजांना महाविकास आघाडीकडून कोल्हापुरातून उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. आम्ही त्यांना सुद्धा वारंवार विनंती केली होती की, शाहू महाराजांनी ही निवडणूक लढवावी. शाहु महाराज आदराचे स्थान असेल तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे, असं आवाहन सतेज पाटलांनी केलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने सामोरे जाऊ. आमच्या महाविकास आघाडीच्या किमान जागांवर चर्चा आहेत, पण महायुतीत अजूनही गोंधळ आहे आपण पाहत असल्याची टीकाही पाटलांनी भाजपवर केली आहे.