South Africa vs India : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या गोलंदजीसमोर आफ्रिकेचा डाव गडगडला. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 176 धावांवर अख्खा संघ गारद झाला. सध्या आफ्रिकेला 78 धावांची आघाडी मिळाली आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 79 धावांची गरज आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्यावेळी आफ्रिकेच्या तीन विकेट्सवर 62 रन झाले होते. एडेन मार्कराम 36 आणि डेविड बेडिंघम 7 रन करून नाबाद होता. याआधी भारताचा डाव 153 धावांवर आटोपला होता. विराट कोहली (44) वगळता भारतीय फलंदाज यशस्वी ठरले नाहीत. 4 बाद 153 धावा असताना पुढील अवघ्या 11 चेंडूत 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव आटोपला. त्याआधी पहिल्या डावात आफ्रिकेला फक्त 55 धावा करता आल्या होत्या. आात दुसऱ्या डावातही फलंदाजांना विशेष काही करता आले नाही.
आफ्रिकेला फक्त 176 धावा करता आल्या. यानंतर भारताला विजयासाठी फक्त 79 धावांची गरज आहे. पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या 6 विकेट केवळ 11 चेंडूत एकही धाव न करता गेल्या. भारताच्या डावात एकूण 7 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतीय संघ पहिल्या डावात 153 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे टीम इंडियाला 98 धावांची आघाडी मिळाली होती.