भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश

Cricket Australia : भारताविरुद्ध होणाऱ्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना आणि अॅशेज मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) बुधवारी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात मॅट रेनशॉ, मार्कस् हॅरिस आणि मिचेल मार्श यांना संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून विश्व टेस्ट चॅम्पियशिप स्पर्धेतील अंतिम सामना सुरू होणार […]

Australia

Australia

Cricket Australia : भारताविरुद्ध होणाऱ्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना आणि अॅशेज मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) बुधवारी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात मॅट रेनशॉ, मार्कस् हॅरिस आणि मिचेल मार्श यांना संधी मिळाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून विश्व टेस्ट चॅम्पियशिप स्पर्धेतील अंतिम सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाल 28 मे पर्यंत संघातील सदस्य संख्या 15 पर्यंत आणावी लागणार आहे. त्यानंतर अॅशेज मालिकाही होणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक लान्स मॉरिस हा पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. त्याला सहा आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. माइकल नेसेर यालाही संघात जागा मिळाली नाही.

भारताचा दौरा करणारे एश्टन आगर, पीटर हँड्सकोंब, मिचेल स्वेपसन आणि मॅट कुहनेमन यांनाही संघात घेतले गेलेले नाही. विकेटकीपर जोश इंग्लिश याला अॅलेक्स कॅरीला पर्याय म्हणून संघात समाविष्ट केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ असा आहे

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस् हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिश, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर.

 

Exit mobile version