T20 World Cup Hardik Pandya : आगामी टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली (T20 World Cup) नाही. सध्या भारतात टी 20 लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा संपल्यानंतर जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधीच हार्दिक पांड्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. हार्दिकला जर विश्वकप संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला सध्या देशात सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. रोहित शर्माच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आता हार्दिक पांड्याची निवड त्याच्या गोलंदाजीवर अवलंबून राहणार आहे.
भावाकडूनच Hardik Pandya ची कोट्यावधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सध्या भारतात टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या अपयशी ठरत आहे. फलंदाजीत बऱ्यापैकी चमकला मात्र गोलंदाजीत तो पूर्ण फ्लॉप ठरला आहे. त्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाची कामगिरीही सुमार राहिली आहे. फलंदाजी करताना हार्दिकने 6 सामन्यात 26.20 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर या सहा सामन्यांत त्याने फक्त 3 विकेट घेतल्या आहेत. धावा देतानाही त्याचा इकॉनॉमी रेट 12 राहिला आहे. म्हणजेच त्याची गोलंदाजी अत्यंत सुमार राहिल्याचे दिसून येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयात मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत हार्दिक पांड्याच्या सध्याच्या कामगिरीवर चर्चा झाली. त्याला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघात सामावून घ्यायचे की नाही याबाबतही चर्चा झाली. हार्दिकने उर्वरित सामन्यात चांगली गोलंदाजी करून सलग ओव्हर्स टाकल्या तर त्याला टी 20 वर्ल्डकप संघात घेता येईल, असा निर्णय घेण्यात आला.
Hardik Pandya : अफगाणिस्तान मालिकेतूनही हार्दिक OUT?; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाची कॅप्टन्सी