Download App

पाऊस पडला, तरीही नो टेन्शन, सामन्याचा निकाल लागणारच; वर्ल्डकप फायनल-सेमीफायनलसाठी नवे नियम

T20 World Cup 2024 : यंदाचा टी 20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात (T20 World Cup) होणार आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी आयसीसीकडून केली (ICC) जात आहे. या स्पर्धेत जवळपास 20 संघ सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे. क्रिकेटच्या स्पर्धेत पावसाची नेहमीच अडचण होते. सामना सुरू असतानाच अचानक पाऊस येतो. पाऊस जर लवकर थांबला नाही तर सामना रद्द करण्याचीही वेळ येते. त्यामुळे प्रेक्षकांचाही हिरमोड होतो. याच गोष्टीचा विचार करून टी 20 विश्वचषकासाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत.

World Cup 2023 : सेमीफायनलसाठी दोन नवीन नियम; सामना रद्द झाला तरी निकाल लागणार

आयसीसीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यंदाच्या टी 20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दोन सामने आणि अंतिम सामन्यासाठी दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. साखळी फेरीतील सामने आण सुपर आठ फेरीतील सामन्यांमध्ये दुसरा डाव फलंदाजी करत असलेल्या संघाने किमान पाच ओव्हर खेळणे बंधनकारक राहणार आहे. पाच ओव्हर होण्याआधीच जर पाऊस आला तर हा सामना पूर्ण झाल्याचे मानले जाणार नाही.

बाद फेरीच्या सामन्यांसाठी दुसरा डाव फलंदाजी करत असलेल्या संघाने किमान दहा ओव्हर फलंदाजी करायला हवी. यावेळी जर पाऊस आला तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल असे काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. म्हणजेच जर या महत्वाच्या सामन्यात जर पावसाने व्यत्यत आणला तर टेन्शन घेण्याचे कारण राहणार नाही. हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवता येईल.

Team India : जिंकल्याचा फायदा नाहीच! टीम इंडियाचा दुसरा नंबर कायम; नेमकं काय घडलं?

 

follow us