मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ 9 मार्चपासून न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्वाची असणार आहे. खरं तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीत फक्त श्रीलंका हा एकमेव संघ उरला आहे, जर श्रीलंकेने या मालिकेत यजमानांचा 2-0 असा धुव्वा उडवला तर त्यांच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा वाढतील.
श्रीलंका क्रिकेट (SLC) ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंका क्रिकेट निवड समितीने 2023 च्या श्रीलंका दौर्याच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी खालील 17 सदस्यीय कसोटी संघाची निवड केली आहे. दरम्यान न्यूझीलंडने घरच्या मैदानावर खेळलेल्या 19 सामन्यांत संघाला केवळ दोन वेळा विजय मिळवता आला आहे.
श्रीलंका 9 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यादरम्यान, दोन कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, तीन एकदिवसीय आणि टी-20 मालिका देखील खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 9 ते 13 मार्च दरम्यान क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. तर 17 मार्चपासून वेलिंग्टन येथे दुसरी कसोटी खेळली जाणार आहे.
श्रीलंकेचा कसोटी संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, निरोशन डिकवेला, निशान मदुष्का, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, चमिका करुणारतने, राजकुमार लामा, कुमार कुमारी, कुमारी ला., असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो आणि मिलन रत्नायके.
DRDO च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हेरगिरीबद्दल अटक
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया सध्या 0-2 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत कांगारू संघाला 0-4 असा पराभव पत्करावा लागला तर त्यांच्या अडचणी लक्षणीय वाढतील. 0-4 ने स्वीप केल्यास डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 60 टक्के गुण होतील, ज्यामुळे श्रीलंकेसाठी प्रथमच अंतिम फेरीत पोहोचण्याचे दरवाजे उघडतील. श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची शेवटची मालिका खेळायची आहे.