श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय, मालिकेत बरोबरी

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, मात्र टीम इंडियाला निर्धारित षटकात 8 विकेट गमावून 190 धावाच करता आल्या. श्रीलंकेला भारताच्या भूमीवर 6 वर्षांनंतर विजय मिळाला. भारताकडून अक्षर पटेलने 31 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. त्याने सूर्यकुमार यादवसह […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, मात्र टीम इंडियाला निर्धारित षटकात 8 विकेट गमावून 190 धावाच करता आल्या. श्रीलंकेला भारताच्या भूमीवर 6 वर्षांनंतर विजय मिळाला.

भारताकडून अक्षर पटेलने 31 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. त्याने सूर्यकुमार यादवसह सहाव्या विकेटसाठी केवळ 42 चेंडूत 91 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 51 धावा केल्या. या विजयासह श्रीलंकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. beat India by 16 runs, level the series

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शनाकाच्या 56 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 206 धावा केल्या. शनाका व्यतिरिक्त कुसल मेंडिसने 52, चरित अस्लंकाने 37 आणि निसांकाने 33 धावा केल्या. भारताकडून उमरान मलिकने 3 तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले.

207 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. भारताने 9.1 षटकात 57 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या, परंतु सूर्या आणि अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.

भारताच्या टॉप ऑर्डरकडून कामगिरी – इशान किशन 2, राहुल त्रिपाठी 5, शुभमन गिल 5, हार्दिक पंड्या 12 आणि दीपक हुडाने 9 धावा केल्या. श्रीलंकेकडून रजिथा, कर्णधार शनाका आणि मदुशंका यांनी 2-2 विकेट घेतल्या. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी राजकोटमध्ये होणार आहे.

Exit mobile version